You are currently viewing हलके फुलके
Oplus_16908288

हलके फुलके

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🪻 हलके फुलके🪻*

 

सकाळी च सुरुवात

दालचिनी, सुंठ, आले

यांचा काढा उर्जास्रोत

मन प्रफुल्लित प्रसन्न झाले.

 

नाश्त्यात लाह्यांचा चिवडा

हलकीशी फोडणी द्या ना

साळी, ज्वारी, राजगिरा

कधी मका, कुरमुरे, मखाना.

 

जेवणात घेऊया फळभाज्या

सर्व प्रकारचे भोपळे, वापरा

त्याच्या छान रेसिपी, अन ज्यूस

मात्र भोजन वेळेत आवरा.

 

हिरव्या मुगाचे छान पदार्थ

कधी लाडू, उसळ, बिरडे,

मोडआले, शिजवून खा सारे

वेगवेगळ्या भाज्यात,आणिधिरडे.

 

वेगवेगळ्या डाळींचा द्या फोडणी

कधी हिंग, जिरे, राई, यांची वारी

चरचरीत आले, लसूण, मिरची

तडकावाली डाळ लागते भारी.

 

सकाळी लवकरच करु सुरुवात

थोडे तरी पथ्यपाणी करुन पाहू

आहारात करु हलकासा बदल

निरोगी दीर्घायू,आनंदात राहू.

 

 

बघू या जमतंय का?

😳🙂

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

प्रतिक्रिया व्यक्त करा