You are currently viewing सर्वसामान्यांना महागाईचा आणखी झटका; घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महाग

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी झटका; घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महाग

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी झटका; घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महाग

एलपीजीच्या दरात तीन महिन्यांत दुसऱ्यांदा वाढ; स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा कोलमडणार

नवी दिल्ली :
देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना रविवारी आणखी एक महागाईचा झटका बसला आहे. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या 14.2 किलो वजनाच्या एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. नवीन दर रविवारी सकाळपासून लागू करण्यात आले आहेत.
या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचली आहे. देशातील इतर शहरांमध्येही सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ही दुसरी वाढ असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरील आर्थिक भार आणखी वाढला आहे. आधीच अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांचे बजेट विस्कळीत झाले असताना गॅस दरवाढीने चिंता वाढली आहे.
या निर्णयामुळे गृहिणींसह मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडणार असून महागाईच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा