मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा.
चिपळूण, मांडकी-पालवण (५ जून २०२६):
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून २०२६ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील वरिष्ठ संशोधन सहायक मुख्य श्री. पी.एम. तल्ला आणि महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. एस. आर. दिवाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, प्राध्यापिका आणि दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक ‘पर्यावरण शपथ’ घेतली.
