*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ गझलकारा डॉ.शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*
*अनलज्वाला*
*आरंभकाफिया*
बसण्याइतकी घरात जागा मला पुरेशी
लिहिण्याइतकी घरात जागा मला पुरेशी
गप्पा करण्या जमतात सख्या घरात माझ्या
जमण्याइतकी घरात जागा मला पुरेशी
मुले पाहुणे नातीगोती कसे जपावे
जपण्याइतकी घरात जागा मला पुरेशी
डॅाक्टरेट पदवी घेण्याचे स्वप्न फुलावे
फुलण्याइतकी घरात जागा मला पुरेशी
आनंदाची वेल घरी या रुजून जावी
रुजण्याइतकी घरात जागा मला पुरेशी
डॅा.शरयू शहा.
