शेतकरी सेवा सोसायटीत मोफत हळद बियाणे वाटप
पहिल्या टप्प्यात ३४ शेतकऱ्यांना २५ किलो बियाण्यांचे वितरण; सतीश सावंत यांचा पुढाकार
कणकवली
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी हंगामातील लागवडीसाठी शेतकरी सेवा सोसायटीत मोफत हळद बियाणे वाटप करण्यात आले. यापूर्वी नोंदणी केलेल्या ३४ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २५ किलो हळद बियाण्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन शेखर सावंत, माजी चेअरमन महादेव उर्फ संतोष सावंत, माजी सरपंच लक्ष्मण उर्फ आबा सावंत, तुषार सावंत, पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेश सावंत, पोलीस पाटील बाळकृष्ण सावंत, प्रकाश घाडीगावकर, नंदू मेस्त्री, सीमा सावंत, विनिता सावंत, सचिव श्रद्धा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
खरीप हंगामात शेतीपूरक व्यवसाय म्हणून हळद लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून सतीश सावंत यांनी बचत गटाच्या माध्यमातून हळद वाटपाचा उपक्रम सुरू ठेवला असून, त्याचाच एक भाग म्हणून यंदा शेतकरी सेवा सोसायटीच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना मोफत हळद बियाणे देण्यात आले.
या योजनेसाठी शेतकऱ्यांची सातबारा उतारा आणि आधार कार्डच्या आधारे नोंदणी करण्यात आली होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात बियाण्यांचे वितरण करण्यात आले असून, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
