You are currently viewing फोंडाघाट ग्रामपंचायतीत श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न

फोंडाघाट ग्रामपंचायतीत श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न

फोंडाघाट ग्रामपंचायतीत श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न

नगरपंचायत दर्जासाठी प्रयत्नांची गरज; प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी

फोंडाघाट : प्रतिनिधी

फोंडाघाट ग्रामपंचायत कार्यालयात आज श्री सत्यनारायण महापूजा धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पूजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी एकमेकांची विचारपूस करत ग्रामविकासासंदर्भात चर्चा केली. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनीही उपस्थिती दर्शवून ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत माहिती घेतली. त्यांनी दुपारनंतर पुन्हा भेट देण्याचे सांगितले.
यावेळी फोंडाघाटच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. वाढती लोकसंख्या, विस्तारत असलेल्या नागरी सुविधा आणि विकासाच्या दृष्टीने नगरपंचायत होणे गरजेचे असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे आवश्यक प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. ग्रामविकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करत कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा