You are currently viewing सांगिर्डेवाडी येथे टँकर-अल्टोची भीषण धडक; दोघेजण जखमी

सांगिर्डेवाडी येथे टँकर-अल्टोची भीषण धडक; दोघेजण जखमी

सांगिर्डेवाडी येथे टँकर-अल्टोची भीषण धडक; दोघेजण जखमी

कुडाळ : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळजवळील सांगिर्डेवाडी येथे शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि अल्टो कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोघेजण किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कणकवलीहून कुडाळच्या दिशेने जाणारा टँकर महामार्गावरील मिडलकटमधून वळत असताना कुडाळहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो कारची त्याला जोरदार धडक बसली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक निलेश परब, माजी नगराध्यक्ष विनायक राणे तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे. अपघातामुळे महामार्गावरील एका लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा