स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त सिंधुदुर्गनगरीत अभिवादन
सिंधुदुर्गनगरी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. अडसूळ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
