You are currently viewing मळेवाड-सावंतवाडी मार्गावरील धोकादायक फांदी युवकांनी हटवली

मळेवाड-सावंतवाडी मार्गावरील धोकादायक फांदी युवकांनी हटवली

मळेवाड-सावंतवाडी मार्गावरील धोकादायक फांदी युवकांनी हटवली

अज्ञात वाहनाच्या धडकेने काजूच्या झाडाची मोठी फांदी रस्त्यावर; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अपघात

सावंतवाडी

मळेवाड ते सावंतवाडी मुख्य रस्त्यावर वरची मळेवाड मसुरकरवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने काजूच्या झाडाची भलीमोठी फांदी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर कोसळली. या घटनेत विद्युत पुरवठा करणारा पोलही पडल्याने काही काळ वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने पुढाकार घेत फांदी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
धडक दिल्यानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. दरम्यान, ही मोठी फांदी दिवसभर रस्त्यावरच पडून असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी कामावर जाणाऱ्या एका युवकाला फांदीचा अंदाज न आल्याने तो थोडक्यात बचावला, मात्र त्याच्या दुचाकीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
या घटनेची बांधकाम विभागाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने पेंडूर घोडेमुख येथील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला. त्यांनी कटरच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली मोठी फांदी हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
प्रशांत शिरोडकर, संदेश मोरजकर, स्वप्नील नेमन, राहुल प्रभू आणि सुधीर परब यांनी या कामात मोलाची मदत केली. त्यांच्या सतर्कतेचे आणि सामाजिक जाणिवेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा