NAB नेत्र रुग्णालयाला नेत्र तपासणी वाहन भेट
२८ मे रोजी भटवाडी येथे वाहन प्रदान समारंभ; लाभार्थ्यांना साड्या व टी-शर्ट वाटप
सावंतवाडी :
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) सिंधुदुर्ग, भटवाडी सावंतवाडी यांच्या वतीने NAB नेत्र रुग्णालयाला नेत्र तपासणी वाहन प्रदान करण्याचा समारंभ गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता NAB नेत्र रुग्णालय, भटवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात NAB सिंधुदुर्गच्या लाभार्थी “दृष्टी बाधितांना” साड्या व टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर भोजन व्यवस्थाही करण्यात आली असून सर्व लाभार्थी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन NAB चे अध्यक्ष श्री. अनंत उचगावकर, सचिव श्री. सोमनाथ जिगजींनी आणि खजिनदार श्रीमती विनया बाड यांनी केले आहे.
हे नेत्र तपासणी वाहन अमेरिका येथील डॉ. देवदत्त मिशाळ व डॉ. सुरेखा मिशाळ यांच्या उदार देणगीतून NAB नेत्र रुग्णालयाला प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री. प्रकाश मिशाळ हे प्रमुख उपस्थित राहणार असून ही देणगी मिळवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे सांगण्यात आले.
