You are currently viewing सफाई कामगारांच्या वारसांना लवकरच नियुक्तीपत्रे

सफाई कामगारांच्या वारसांना लवकरच नियुक्तीपत्रे

सफाई कामगारांच्या वारसांना लवकरच नियुक्तीपत्रे

पुढील दौऱ्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून पत्रे देणार; पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सावंतवाडी

येथील नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या वारसांना पुढील दौऱ्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून नियुक्तीपत्रे देऊ, असे आश्वासन राज्याचे बंदरे विकास, मत्स्यव्यवसाय आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांनी ही ग्वाही दिली.

सावंतवाडी नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काने तात्काळ नोकरी मिळावी, यासाठी गोपाळ नामदेव सावंत, सुनील नारायण परब, संदीप भागू पाटील व नितीन सदानंद कदम या वारस प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.
यावेळी बोलताना पालकमंत्री राणे यांनी सांगितले की, सावंतवाडी नगर परिषद कौन्सिलने सफाई कामगारांच्या वारसांना त्वरित नोकरी देण्याबाबत एकमताने ठराव मंजूर केला आहे. शासन या विषयाबाबत अत्यंत सकारात्मक व सतर्क असून, नगर विकास मंत्रालयाने मागील अधिवेशनातही यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे.
पालकमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे सफाई कामगारांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला असून, शिष्टमंडळाने त्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा