*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”वैशाख मृग”*
मृग नक्षत्र आभाळ सृष्टीचे सघन मित्र
सृष्टी वाट पाहे पर्जन्याची चातका प्रमाणंIIधृII
नित्य ऋतुचक्र आहे आदीम काळापासून
फिरता काळ सुख दुःखाचा प्रत्यय देत
सृष्टीचा शृंगार विलसतो आकाशापर्यंतII1II
सूर्य तळपतो सर्वत्र वैशाख मासांत
तप्त उन्हांत सृष्टीतील झाडे उभी दिमाखांत
वैशाखाची काहिली कमी होते चैत्रपालवीनंII2II
मृग चाहूलीने मुंग्या कीटक प्रसवतांत
मातीतून उगवलेले भासे वैभव संपन्न
मानव सृष्टीचा जुळतो भावनिक भावबंधII3II
पक्षी तृणांकूर सावळ्या घनाची वर्दी देत
वळीवाचे चाहूलीने कृषक करी नांगरट
विजा लवतात वादळ वारा मेघ बरसत II4II
गुरे ऊंडारतात पाखरे करिती कलकलाट
शुष्क भूमी सृष्टी तृप्त होते मृगाचे पावसानं
वरूण देवाचे कृषीवलांचे मानू ऋणII5II
©️काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
