फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख
संतोष कटारिया; एमआयटी एडीटी विद्यापीठात पदवी फॅशन शो दिमाखात संपन्न
पुणे:
फॅशन म्हणजे केवळ डिझाईन नव्हे, तर ती आपली ओळख असते. आपण केलेल्या प्रत्येक डिझाईनद्वारे जगाला त्यांच्या संस्कृतीची, वेशभूषेची एक कथा सांगितली जाते. त्यामुळे स्वतःच्या कल्पनांशी कायम प्रामाणिक राहा, सातत्याने नवकल्पना करत राहा आणि जगाला आणखी सुंदर बनवा, असे मत पेपरमिंट क्लोदिंग प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक संतोष कटारिया यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (आयओडी)च्या फॅशन विभागाचा ११ वा वार्षिक ग्रॅज्युएशन फॅशन शो (जीएफएस) २०२६ निमित्ताने बोलत होते. याप्रसंगी ‘ग्लॅड यू केम अँड ग्लॅड वी मेट’चे संस्थापक मॅडी अमृतकर, सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर टीना रांका, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, प्रा. डॉ. दांडेश्वर बिसोई, तसेच फॅशन डिझाईन विभाग प्रमुख डॉ. अर्शिया कपूर आदी उपस्थित होते.
या फॅशन शोमध्ये २०२२–२०२६ या बॅचमधील बी.डिझ. फॅशन कम्युनिकेशन, बी.डिझ. फॅशन डिझाईन आणि एम.डिझ. फॅशन मॅनेजमेंट व मार्केटिंग या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनी डिझाईन कलेक्शन्स, फॅशन फिल्म्स, प्रकाशने आणि ब्रँडिंग प्रोजेक्ट्स सादर केले. प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांची वैयक्तिक डिझाईन ओळख आणि व्यावसायिक तयारी स्पष्टपणे दिसून आली.
यावेळी संतोष कटारिया यांनी बाजारपेठेचे आकलन आणि ग्राहकांची गरज समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सर्जनशीलतेसोबत व्यावसायिक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मॅडी अमृतकर यांनी विद्यार्थ्यांना मजबूत नेटवर्क तयार करण्याचा, सहकार्याला प्राधान्य देण्याचा आणि डिजिटल ओळख निर्माण करण्याचा सल्ला दिला.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित पालक व डिझाईन क्षेत्रातील विविध व्यावसायिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एमआयटी एडीटीचा ग्रॅज्युएशन फॅशन शो हा उदयोन्मुख डिझायनर्ससाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत असून, त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची भक्कम सुरुवात असल्याचे मतही उपस्थितांनी मांडले.
*चौकट*
*वेषभूषा ओळखीची प्रभावी भाषा – डॉ. मंगेश कराड*
वेषभूषा ही केवळ बदलत्या ट्रेंड्स किंवा फॅशनपुरती मर्यादित नसून ती व्यक्तिमत्त्वाची प्रभावी अभिव्यक्ती आहे. आपण काय परिधान करतो यावरून आपल्या संस्कृती, मूल्ये, व्यक्तिमत्त्व आणि भावनांचे दर्शन घडते. सौंदर्यापलीकडे जाऊन वेषभूषा अर्थ आणि आठवणी जपते, ज्यामुळे व्यक्ती स्वतःकडे कसे पाहतात आणि इतर त्यांना कसे पाहतात, हे ठरते. अशा प्रकारे वेषभूषा ही ओळखीची एक मूक पण प्रभावी भाषा ठरते, जी वैयक्तिक असली तरी सर्वांना समजणारी आहे, असे प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी यावेळी व्यक्त केले.
——————-
_________________________
संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….*
*🎓 संजीवनी प्रशिक्षण संस्था, चिपळूण 🎓*
*(संजीवनी डी.एम.एल.टी. व नर्सिंग कॉलेज)*
*📢 Admission Open 2026–27*
*👉 महाराष्ट्र शासन नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त (Code: 1203)*
*👉 इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, दिल्ली मान्यताप्राप्त*
*🌟 नर्सिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी!*
*✨ G.N.M. Nursing Course*
*📚 कालावधी: 3 वर्ष*
*✅ 12वी (कोणत्याही शाखेनंतर) प्रवेश उपलब्ध*
*✅ 100%* नोकरीची संधी*
*🏥 उपलब्ध कोर्सेस*
*🔹 GNM Nursing – 3 वर्ष*
*🔹 D.M.L.T. (पॅथॉलॉजी) – 1 वर्ष*
*🔹 AST. N.M. (नर्सिंग) – 2 वर्ष*
*🔹 D.O.T.T. (ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी) – 2 वर्ष*
*🔹 M.P.H.W. (मल्टिपर्पज हेल्थ वर्कर) – 2 वर्ष*
*🔹 रुग्ण सहाय्यक (Patient Assistant) – 1 वर्ष*
*🎯 विशेष वैशिष्ट्ये*
*✔️ 100%* नोकरीची संधी*
*✔️ अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक*
*✔️ अत्याधुनिक प्रॅक्टिकल ट्रेनिंग*
*✔️ हॉस्पिटलशी संलग्न प्रशिक्षण*
*📚 पात्रता*
*👉 8 वी / 10 वी / 12 वी पास किंवा नापास विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र*
*📍 कॅम्पस व पत्ता*
*🏫 वांगडे शॉपिंग सेंटर, दुसरा मजला,
बहाद्दूर शेख नाका, चिपळूण*
*🏫 मंदार कॅम्पस, पेढांबे,
ता. चिपळूण, जि. रत्नागिरी*
🌐 www.sanjeevaniprashikshansanstha.com�
*📞 संपर्क*
📱 7588476381
📱 7218850220
📱 7218850223 / 7276850220
*👉 मर्यादित जागा – आजच प्रवेश निश्चित करा!*
*👉 नर्सिंग क्षेत्रात यशस्वी करिअरची सुरुवात संजीवनीसोबत करा!*
#GNMNursing #NursingAdmission #CareerInNursing #AdmissionOpen2026
#संजीवनी नर्सिंग कॉलेज
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/202701/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
