You are currently viewing भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते फोंडाघाट पावणादेवी येथे नवीन गोशाळेचे उद्घाटन

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते फोंडाघाट पावणादेवी येथे नवीन गोशाळेचे उद्घाटन

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते फोंडाघाट पावणादेवी येथे नवीन गोशाळेचे उद्घाटन

फोंडाघाट

शनिवार दिनांक 25 /4 /2026 रोजी फोंडाघाट -पावणादेवी येथे दिवाकर विठ्ठल ठाकूर उर्फ राजा ठाकूर यांच्या घरी “लक्ष्मीकांत गोशाळेचे” उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी राजा ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व त्यानंतर श्री गणेश पूजन व दीप प्रज्वलन या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रसन्ना देसाई व जिल्हा परिषद सदस्य राजन चिके फोंडाघाट यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच तन्वी मोदी, प्रतिष्ठित ग्रामस्थ शशिकांत ठाकूर, मागवली गावचे आदर्श शेतकरी महेश संसारे, किसान मोर्चाचे उमेश सावंत व्यासपीठावर उपस्थित होते
यानंतर गोशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक श्री शशिकांत ठाकूर गुरुजी यांच्या हस्ते फीत कापण्यात आली व देशी गाईची पूजा श्री प्रसन्ना देसाई यांनी केली या कार्यक्रम प्रसंगी राजन चिके जिल्हा परिषद सदस्य, सौ तन्वी मोदी उपसरपंच फोंडा घाट, उमेश सावंत, महेश संसारे, मारुती मिस्त्री, बांदल, सीमा परुळेकर, बाबू वाळवे, राजा पावस्कर ,राजेंद्र मोरये, उदय ठाकूर, भाई तेली , सुवर्णा राणे,इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमा वेळी सर्व मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर दिवाकर उर्फ राजा ठाकूर यांचे मनोगत वाचन करण्यात आले. त्यांच्या आयुष्याची सुरुवात, देशी गोपालन करण्याचा निर्णय, त्यांना मिळालेले पाठबळ, व शेवटी गो सेवेपासून मिळणारे आत्मिक समाधान व फायदे इत्यादीचे थोडक्यात वाचन करण्यात आले. या कार्यक्रम संबंधी भाषण करताना राजन चिके म्हणाले की सध्या रासायनिक खताचा बेसुमार वापर होत असून प्रत्येक व्यक्ती ही रोगी झालेली आहे आता जगायचे असेल तर सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यासाठी प्रत्येकाने एक तरी देशी गाय पाळावी. तसेच गोपालन का करावे याचे थोडक्यात महत्व सांगण्यात आले .राजा ठाकूर यांना लागणारी सर्वतोपरी मदत जिल्हा परिषद सदस्य या नात्याने मी करणार अशी ग्वाही दिली.
शेवटी अध्यक्षीय भाषणात माननीय श्री प्रसन्ना देसाई यांनी सांगितले हे काम ईश्वरीय आहे जर देशी गायीच्या पाठीवरून दिवसातून दोन वेळा हात फिरवला तर शुगर ब्लड प्रेशर यासारखे आजार बरे होतात. राजा ठाकूर यांनी जो नवीन उपक्रम राबविला म्हणजेच दोन देशी गाईंच्या मध्ये बेड ठेवून जे कॅन्सर ग्रस्त पेशंट व इतर आजार पेशंट असतील तर तिथे त्यांच्या सानिध्यात राहिल्यावर व झोपल्यावर आजार पूर्णपणे नाहीसा होतो त्यामुळे या नवीन उपक्रमास आमच्याकडून शुभेच्छा. तसेच या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व जनजागृती असून एमटीडीसी चे डायरेक्टर यांची भेट घेऊन पर्यटनाच्या माध्यमातून या गोशाळेत दिली जाणारी थेरीपी चे मार्केटींग करुन महाराष्ट्रातील पर्यटकांना याबद्दल माहीती दिली जाईल , जेणेकरून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचा फायदा सर्वांना होईल .तसेच त्यांना लागणारी सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी देशी गाई च्या शेण व गोमूत्र यापासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.
शेवटी समारोप भाषण करताना राजा ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले व विषमुक्त शेती- सेंद्रिय शेती असा नारा देण्यात आला. या कार्यक्रमाचे सर्वांकडून कौतुक केले गेले, व हा कार्यक्रम पार पडला असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा