शिरोड्यात २ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
रामपुरुष युवा मित्र मंडळाचा पुढाकार; गोवा मेडिकल कॉलेजची ब्लड बँक राहणार उपस्थित
सिंधुदुर्ग
शिरोडा परबवाडा येथील रामपुरुष युवा मित्र मंडळाच्या वतीने मंगळवार, दिनांक २ मे २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी गोवा मेडिकल कॉलेजची ब्लड बँक रक्त संकलनासाठी उपस्थित राहणार आहे.
रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात, ही जाणीव ठेवून परिसरातील नागरिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिराचा तपशील :
दिनांक : मंगळवार, २ मे २०२६
स्थळ : उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा
वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

