You are currently viewing परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेला जिल्ह्यात तृतीय क्रमांक

परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेला जिल्ह्यात तृतीय क्रमांक

परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेला जिल्ह्यात तृतीय क्रमांक

जिल्हा परिषद सिंधुदुर्गतर्फे सत्कार; मान्यवरांची उपस्थिती

सिंधुदुर्ग :
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचा सत्कार मा. शिक्षण सभापती श्री. प्रितेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शाळेच्या व गावाच्या वतीने सदर सत्कार स्विकारण्यात आला. कार्यक्रमास मा. अध्यक्ष श्री. दिपक गवस तसेच मा. गटशिक्षणाधिकारी श्री. नदाफ साहेब उपस्थित होते.
झोळंबे शाळेच्या या यशामुळे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा