You are currently viewing झाले मोकळे आकाश

झाले मोकळे आकाश

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुशीला पिंपरीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*झाले मोकळे आकाश*

 

वाट काळोखात क्रौर्याची

गस्त सावित्रीत धैर्याची

 

झेलूनिया दगड गोटे

शिक्षणाचे दाविले सोटे

 

झाले मोकळे आकाश

खुले सजग अवकाश

 

तुरुंगाचे द्वार खुलले

सरले बंदिवान सोवळे

 

जिजाऊ स्वतंत्र प्रज्ञावंता

पुत्र घडविला स्वराज्यदाता

 

पुण्यश्लोक अहिल्या राणी

गाजे इतिहास पानोपानी

 

येसूबाई स्वराज्य तह बंदिस्त

गाफिल नाही मनाची गस्त

 

पहिली डाॅक्टर आनंदी

शारदेचे चरण वंदी

 

अंतरिक्ष कल्पना धैर्यवंत

सुनिता विल्यम यशवंत

 

साकारले स्वप्न नारीचे

पसरले पंख भरारीचे

 

सुशीला हेमचंद्र पिंपरीकर, नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा