You are currently viewing १८ एप्रिलला रेडी गणपतीचा ५० वा वाढदिवस सोहळा
Oplus_16908288

१८ एप्रिलला रेडी गणपतीचा ५० वा वाढदिवस सोहळा

वेंगुर्ला :

कोकणातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेडी येथील स्वयंभू द्विभुज श्री देव गणपतीचा ५० वा वाढदिवस सोहळा शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नागोळेवाडी-रेडी येथील या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त देवस्थानच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या मंगलमयी दिवसाची सुरुवात पहाटे ६ वाजता अभिषेकाने होणार असून, सकाळी ८ वाजता श्री सत्यविनायक महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२:३० वाजता महाआरती झाल्यानंतर भाविकांना तीर्थप्रसाद देण्यात येणार आहे. तसेच दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

धार्मिक विधीनंतर दुपारच्या सत्रात भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत स्थानिक भजन मंडळांची भजने सादर होणार आहेत. सायंकाळी ५ वाजता ‘श्री गणेश माऊली संगीत ग्रुप’चा ‘स्वर गणेश’ हा कार्यक्रम रंगणार आहे. रात्री ८:३० वाजता ‘नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळा’चे नाटक सादर होणार आहे.

श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट आणि नागोळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा