पुणे (गुरुदत्त वाकदेकर):
भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या सांस्कृतिक विभागातर्फे सामाजिक क्षेत्रातील मौलिक योगदानाबद्दल तुळसीदास उणेचा, मदन डांगी, भारती महाडिक, सारिका सासवडे आणि प्रिया प्रमोद दामले यांना ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या सांस्कृतिक विभागाचे शहर अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी केली. सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि समाजोपयोगी उपक्रमांत सातत्याने योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार वितरण सोहळा लवकरच पुणे येथे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष पोपटराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहितीही डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी दिली.
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा देण्याचा हा उपक्रम असल्याने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या घोषणेचे स्वागत होत आहे.
