You are currently viewing खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील व सुनील तटकरे राहणार उपस्थित

खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील व सुनील तटकरे राहणार उपस्थित

खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील व सुनील तटकरे राहणार उपस्थित

१० एप्रिल रोजी भव्य आयोजन; राज्यभरातील मान्यवरांची उपस्थिती, कोकण विकासातील योगदानाचा होणार गौरव

सिंधुदुर्ग
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त वाढदिवस सोहळा १० एप्रिल रोजी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला राज्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असून, सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
विशेषतः कोकणाच्या विकासासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा गौरव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
खा. नारायण राणे अमृतमहोत्सवी समितीकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून, हा सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लक्षवेधी ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा