You are currently viewing जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची पतंजली योग समितीची सदिच्छा भेट

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची पतंजली योग समितीची सदिच्छा भेट

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची पतंजली योग समितीची सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग :

पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या जिल्हा समितीने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ही भेट सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद कार्यालयातील अध्यक्षीय दालनात पार पडली.
यावेळी प्रमोद कामत यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पतंजली योग समितीमार्फत जिल्हाभरात सुरू असलेल्या योगप्रचार आणि प्रसाराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही कामत यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या सहयोग शिक्षण प्रशिक्षण उपक्रमासाठीही त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर, जिल्हा महामंत्री विकास उर्फ विकी केरकर, जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मण पावसकर, युवा भारत जिल्हा प्रभारी डॉ. प्रशांत परब, भारत स्वाभिमान कुडाळ तहसील प्रभारी योगेश गवंडे, कार्यकर्ते रवींद्र वालावलकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आवश्यक सहकार्याची ग्वाही दिल्याबद्दल पतंजली योग समिती सिंधुदुर्गतर्फे प्रमोद कामत यांचे आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा