नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी भव्य स्पर्धा; विजेत्यास १५ हजार रुपये व चषक
कणकवली / (प्रतिनिधी):
माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने आणि विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्या वतीने ‘खासदार श्री २०२६’ या भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली येथे रंगणार आहे.
या स्पर्धेत ५५, ६०, ६५ आणि ७० किलो अशा चार वजनी गटांमध्ये स्पर्धा होणार असून ती सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित ठेवण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ‘खासदार श्री २०२६’ हा किताब, रु. १५,००० रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय इतरही आकर्षक बक्षिसांची योजना करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक शरीरसौष्ठवपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांनी केले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी राजन परब (९४२२४३४४४४) आणि अमित कदम (७५०६०७०७०२) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.
