*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नमन झाडांना ……*
तोडूनी जंगल केले साफ
कसे हो करू तुम्हाला माफ
झाली हो वाताहत सारी
पक्षी ना दिसती अंबरी
ढगांची झरते ना झारी … हो जी जी र जी …
उजाड माळराने झाली
किलबिल नाही पक्षी बोली
रिकामी पडली हो ढोली
पाखरे सारी कुठे गेली ….
वाताहत आम्ही सारी केली … हो जी जी र जी
ढासळला पहा समतोल
झाडे तोडूनी अनमोल
मधुर ते हरवले बोल
कॅांक्रिट वाटे अनमोल
खाई खणली हो खोल …जी जी र र जी
पहा उघडा हो डोळे
ना तर पारच वाटोळे
श्वास ही घेणे मुष्कील
जगणे.. कंठाशी प्राण
झाडांनी वाढवूत शान हो .. जी जी र जी
माती पाणी झाडे हो प्राण
जगणे त्या विन कठीण
लावू या चला चला झाडे
एकेक बाळ जसे वाढे
हिरवे करूनी सोडू रान … जी जी र जी …
झाडांवाचून ना भविष्य
झाडे खुष आम्ही खुष
चिरंतन त्यांचा सहवास
जगण्याचीच हमी खास
मोकळा घेऊ चला श्वास … हो जी जी र जी …
“पर्यावरण वाचवा … स्वत:ला वाचवा …”
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
