You are currently viewing वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हुमरस येथे विद्यार्थ्यांना साहित्य व अल्पोपहार वाटप

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हुमरस येथे विद्यार्थ्यांना साहित्य व अल्पोपहार वाटप

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हुमरस येथे विद्यार्थ्यांना साहित्य व अल्पोपहार वाटप

हुमरस

माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हुमरस शिवसेना शाखेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत हुमरस गावातील दोन शाळा तसेच तीन अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना वॉटर बॉटल व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य देत वाढदिवस साजरा करण्यात आला, ज्याचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी माणगाव पंचायत समिती सदस्य श्री. योगेश धुरी यांचा जेष्ठ शिवसैनिक बाबू परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेना शाखाप्रमुख संतोष परब, माजी सरपंच अनुप नाईक, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. शलाका कवटकर, सिद्धेश नाईक, ज्ञानेश्वर सावंत तसेच युवासेना उपशाखाप्रमुख महेश वारंग यांची उपस्थिती होती.
तसेच जेष्ठ शिवसैनिक सुरेश कुडकर, विकास कुडकर, मायन स्वामी, प्रकाश आरोनदेकर, श्यामाप्रसाद कामत, विनायक नाईक, मोहन देउलकर, सतीश कवटकर, महेश कुडकर, मयूर गुडेकर, गौरव तामाणेकर आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा