कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.नितेश राणे व आयुष्यमान भारतचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते नेरूर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर येथे बेळगाव येथील के. एल. ई. हॉस्पिटलच्या १४२ डॉक्टर – स्टाफ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या सर्व रोगावरची तपासणी उपचार यांचा समावेश असलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे सकाळी ९.३० वाजता उद्घाटन होत आहे.
या उद्घाटन समारंभाला कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार निलेश राणे, बॅ.नाथ पै फाऊडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, जि प सदस्य रुपेश पावसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिल नेरूरकर, के. एल. ई. चे डॉ. माधव प्रभू, के. एल. ई. चे संचालक अल्लमप्रभू कुडची, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, कुडाळचे तहसिलदार सचिन पाटील, अजित शिरोडकर, गौड ब्राह्मण सभेच्या राजश्री सामंत, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, कुडाळ पंचायत समिती सदस्या (नेरूर) दीप्ती नाईक, नेरुर सरपंच भक्ती घाडीगावकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर उपस्थित राहणार आहेत.
तरी या मोफत आरोग्य शिबिराचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.
