You are currently viewing निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा उपक्रम
Oplus_16908288

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा उपक्रम

सावंतवाडी तालुक्यात राणे समर्थकांचा सामाजिक पुढाकार; ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत

सावंतवाडी (प्रतिनिधी) :

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. माजी नगरसेवक तसेच राणे समर्थक गुरु मठकर यांच्या पुढाकारातून तब्बल पन्नास विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या.

सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना सुलभता मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या प्रसंगी गुरु मठकर यांनी राणे कुटुंबीयांबद्दलची आपुलकी व्यक्त करत, वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करण्याचा हेतू असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, जिल्हाप्रमुख संजू परब, दत्ता सामंत, संजय पडते यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा