You are currently viewing आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा
Oplus_16908288

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा

१८ मार्च रोजी श्री सिंधुदुर्ग राजा गणराया मैदानावर स्पर्धा

कुडाळ :

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील श्री सिंधुदुर्ग राजा गणरायाच्या मैदानामध्ये बुधवार १८ मार्च रोजी संध्या. ५ वाजल्यापासून महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा महिलांसाठी असून १० महिलांचा संघ यामध्ये सहभागी होऊ शकतो स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रुपये १० हजार व चषक द्वितीय क्रमांक रुपये ५ हजार व चषक तृतीय क्रमांकास रोख रुपये ३ हजार व चषक तसेच सहभागी संघातील महिलांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

तरी इच्छुक महिला संघानी आपली नाव नोंदणी रेवती राणे (९४२२३७९६१२) व नगरसेविका चांदणी कांबळी (९९२१०५६४१९) यांच्याजवळ करावी असे आवाहन शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा