You are currently viewing स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृतिप्रीत्यर्थ ‘आपण व्यक्त होऊया ‘ समितीकडून तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका

स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृतिप्रीत्यर्थ ‘आपण व्यक्त होऊया ‘ समितीकडून तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका

स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृतिप्रीत्यर्थ ‘आपण व्यक्त होऊया ‘ समितीकडून तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका :

सावंतवाडी

स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक ११ मार्च २०२६ रविवार रोजी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धा , जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम गटासाठी म्हणजेच इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा तर, द्वितीय गटासाठी म्हणजेच इयत्ता इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये द्वितीय गटात चित्रकला स्पर्धेत प्रशालेतील इयत्ता चौथी मधील कु. प्रार्थना नाईक हिने प्रथम क्रमांक, कु. सार्थक मालवणकर याने द्वितीय क्रमांक, कु. आरोही गावडे हिने चौथा क्रमांक व कु. अवनी गावडे हिने पाचवा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचा पाठिंबा व प्रशालेतील कला शिक्षिका सौ. सुषमा पालव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व त्यांच्या सर्जशीलतेबद्दल शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा