जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत; सावंतवाडीत समर्थकांकडून आनंदोत्सव
सुधीर आडीवरेकर व दिलीप भालेकर यांच्याकडून पुष्पगुच्छ देत अभिनंदन
सावंतवाडी
जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित झाल्यानंतर सावंतवाडी शहरात त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत कामत यांना शुभेच्छा देत त्यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केला.
यावेळी सावंतवाडी भाजपचे नगरसेवक तथा सभापती सुधीर आडीवरेकर आणि भाजप सावंतवाडीचे सरचिटणीस दिलीप भालेकर यांनी प्रमोद कामत यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या प्रसंगी अनेक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमोद कामत यांच्या निवडीमुळे सावंतवाडी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
