You are currently viewing सिंधूरत्न टॅलेंट सर्च(STS) परीक्षेत कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सिंधूरत्न टॅलेंट सर्च(STS) परीक्षेत कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सिंधूरत्न टॅलेंट सर्च(STS) परीक्षेत कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सावंतवाडी

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेतील इयत्ता सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष -2025-26 या कालावधीत झालेल्या सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश मिळविलेले आहे.

या परीक्षेमध्ये प्रशालेतील इयत्ता सहावीच्या वर्गातील कुमारी.स्वरा अभय वाटवे 140 (सिल्वर मेडल)कुमारी.समृद्धी नरेंद्र होडावडेकर 112 (ब्राँझ मेडल)कुमार. आरुष विठोबा परब 114 (ब्राँझ मेडल)इतर सहभागी विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तसेच इयत्ता सातवीतील 14 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेले होते.या परीक्षेमध्ये दोन गोल्ड मेडल, दोन सिल्वर मेडल, दोन ब्राँझ मेडल प्राप्त करून प्रशालेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोववलेला आहे. यामध्ये इयत्ता सातवीतील कुमारी अवनी रामनाथ बावकर-170 (गोल्ड मेडल), कुमारी जिज्ञासा मधुकर देसाई-156(गोल्ड मेडल), कुमारी दूर्वा अतुल केसरकर -132(सिल्वर मेडल), कुमार योगी मेघनाथ लेले-138 (सिल्वर मेडल), कुमारी चैतन्या कृष्णा पास्ते 120(ब्राँझ मेडल), कुमारी सानवी रवींद्र सावंत-124 (ब्राँझ मेडल) प्राप्त करून घवघवीत यश मिळविलेले आहे. या विद्यार्थ्यांना श्री जी.बी.गवस व श्री पी.बी.बागुल यांचे सहकार्य लाभले.

या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशालेचे व संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशजी पई, सचिव श्री प्रसाद नार्वेकर, संस्थेचे संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत भुरे, पर्यवेक्षक श्री सुबोध वराडकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर वृंद,पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा