You are currently viewing सोने केले सुखी आयुष्याचे
Oplus_16908288

सोने केले सुखी आयुष्याचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सोने केले सुखी आयुष्याचे*

(10)

 

काजवे चमकले दिवस असुनी

*अक्षर मोहिनीने* पडलो गार

पाहून प्रदर्शन *कॅलीग्राफीचे*

खेळलो काॅलेज सोडून जुगार…..1

 

पसंत केली *मोहिनी* सरांची

असली जरी ती थोडी तिरळी

राब राब राबलो *सासुरवाडी*

साजरी केली *प्रथम दिवाळी*….2

 

हरकती सा-या *मुळाक्षरांच्या*

रफार वेलांटीत सुसाट सुटायच्या

लावून वळणे आणले वठणीवर

शाबासक्या मिळाच्या तेव्हा सरांच्या

 

नव्हता स्वभाव *शांत कुणाचा*

मोडल्या तंगड्या खूप अक्षरांच्या

वठणीवर आणून दिला आकार

सजल्या पाट्या अनेक घरांच्या

 

लावून वळणे द्वाड अक्षरांना

वठणीवर आणले अधूनमधून

केली तक्रार जरी *सरांकडे*

घेतले त्यांनीही बरेच शिकून

 

आयुष्य लावून पणास मी

भलेही केले *गुरु कन्येचे*

नातू रूपाने देऊन दक्षिणा

सोने केले सुखी आयुष्याचे

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा