You are currently viewing रंग लावू का

रंग लावू का

*ज्येष्ठ लेखक कवी पत्रकार ॲड. रुपेश पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*—– रंग लावू का —–*

 

तुझ्या रूपाच्या गोड रंगाला

रंग लावू का, तुझ्या अंगाला

तू गोरी गं मऊ मखमली

माझी पिचकारी रंगानं भरली

 

तुझी शराबी अशी ही चाल

तुझ्या मोहाचे किती गं रंग

तू झाली आता बघ ओली

रंग पंचम रंगानं सजली

 

मी दिवाना तुझा गं कान्हा

राधा नाजूक तू अशी बाला

तू आहे अजून कोरी

तुझ्या रंगाची आहे मला गोडी

 

(ती)

तुझ्या बोलत मी नाही यायची

कर तुझी घागर रिकामी

आज खेळ रंगांची होळी

उद्या बघू या मी तुझी राणी

 

कवी ॲड.रुपेश पवार

प्रतिक्रिया व्यक्त करा