You are currently viewing मढं निघालं सरणावर ….!!

मढं निघालं सरणावर ….!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मढं निघालं सरणावर ….!!*

 

मढ निघालं सरणावर

किरवंताना झाली घाई

कुडीत अडकला जीव वेळ ..सरकत नाही ….!

 

जन्मागत मरण येते

पिंज-यातच विसावते आशा

भान गमावले गर्भाने

गर्भच शोधतो नकाशा..!

 

ताणून झोपला स्वप्नमुक्त

जन्मभर केली मरणतयारी

श्वासाचाचं घास भरला

उचलला आयुष्याचा गिरी..!

 

वेडापिसा जीव जुना

असंख्य फणांच्या शय्येवर

सारी ..धडपड पडझड

विराम सामूहिक चितेवर..!

 

देवा… पुरे झाले..रे

लांबवू नकोस..हा सोहळा

सारेच आता कंटाळले

हो की …आता मोकळा..!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा