You are currently viewing संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त कलमठ ग्रामपंचायतीचे स्वच्छता अभियान

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त कलमठ ग्रामपंचायतीचे स्वच्छता अभियान

ग्रामस्वच्छतेच्या संदेशातून महापुरुषांना खरे अभिवादन; मान्यवर व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कणकवली :

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कलमठ ग्रामपंचायत वतीने स्वच्छता अभियान राबवून त्यांना अभिवादन करण्यात आले. गावाला ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’मध्ये पुरस्कार प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही जयंती विशेष उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त कलमठ बाजारपेठ व शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ग्रामस्वच्छतेचा संदेश जगभर पोहोचवून स्वच्छतेची चळवळ उभारणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीदिनी स्वच्छता अभियान राबवणे हेच त्यांना खरे अभिवादन असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले.

या उपक्रमात जिल्हापरिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरू वर्देकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रविण कुडतरकर, मुख्याध्यापक मधुरा सावंत, सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, स्वाती नारकर, प्रमोद पवार, विद्या लोकरे, इंदू डगरे, सुप्रिया देसा, एकता फाटक, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा कीर्ती मेस्त्री, वैदेही खरात, पूजा हुन्नरे, शुभांगी सावंत, साक्षी राडये, मधुरा परब, ज्योती जाधव, वसंत सावंत, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, जयेश मेस्त्री तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे परिसर स्वच्छ व सुशोभित झाला असून, संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा