You are currently viewing प्रिया
Oplus_16908288

प्रिया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

*प्रिया*

प्रिया माझी राधा बावरी
जाणून घे अंतरी
मुर्त नांदते तुझी
माझिया मनमंदीरी—-

बघ एकदा तरी
मनातील जख्मा
विठ्ठल भक्तीतली
तूच माझी रख्मा—-

झाल्या असह्य यातना
कासावीस झाला जीव
दर्शनाची तव अभिलाषा
कर तुच तजवीज—-

तुझ्यात माझा जीव गुंतला
अंतरी तडफडतो
तुझ्या एक नजरेसाठी
जीव अती वेडावतो—-

किती लिहू प्रेमपत्र
किती फाडु कात्रणे
एकदा तरी तवप्रेमाची
उडून येऊ दे कबुतरे—-

हृदयी मंदिरी माझ्या
मूर्त तुझी गोजिरी
रामभक्त हनुमानासत्व
तुझीच काया अंतरी—-

नको करू उशीर सखे
ये धावून सत्वरी
देवदास,मजनू,तुझा ग
अश्रू माझे सावरी—-

शीला पाटील. चांदवड .(नाशिक)

प्रतिक्रिया व्यक्त करा