You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”छत्रपती शिवाजी महाराज”* 

 

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजे महान

प्रजाहितदक्ष अनाथांचे नाथ करिती कल्याणIIधृII

 

शिवबांना माता जिजाऊ लाभले राजे शहाजी तात

शिवनेरी किल्ला जुन्नर महाराजांचे जन्मस्थान

जिजाऊंनी शिकवले शौर्य महाभारत रामायण II1II

 

गुरु दादोजिंनी शिकवले शस्त्रास्त्र चालवणं

तलवारबाजी दांडपट्टा घोडे स्वारी दिले शिक्षण

शिकवले युद्धकलांमध्ये विशेष नैपुण्यII2II

 

मावळ प्रांतात फिरले सर्वत्र सवंगड्यां सोबत

फिरताना रयतेचे दुःख जाणले उमजलं

हिंदवी स्वराज्याची प्रेरणा झाली जागृतII3II

 

तुकोबा रामदासांनी राज्यकारभार नीतिचे दिले शिक्षण

सोळाव्या वर्षी मंदिरात स्वराज्याची घेतली शपथ

तोरणा किल्ला जिंकून रोवली स्वराज्य मुहूर्तमेढII4II

 

महाराजांचे अष्टप्रधान मंडळात होते मंत्री आठ

प्रत्येक मंत्री आपापल्या खात्यात तरबेज निष्णांत

आरमाराचे जनक भवानीचे पूजक करती रक्षणII5II

 

महाराजांनी एकशे अकरा किल्ले बांधले नवीन

महाराजांची रणनिती गनिमीकावा आधारित

भूगोल वेग मुत्सद्दी अभ्यास करती कल्पकतेनंII6II

 

शूर द्रष्टे शिवअवतार युगपुरुष नितीवंत

तेज:पुंज श्रीमंत योगी कीर्तीवंत शुद्ध आचरण

आजच्या काळात त्यांचे विचार करिती मार्गदर्शनII7II

 

निश्चयाचा महामेरू राहे बहुतजनांस आधार

गो-ब्राह्मण प्रतिपालक होत क्षत्रिय कुलभूषण

जाणता राजांना करू मानाचा मुजरा कृतज्ञतेनंII8II

 

©️कवी.श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा