सिंधुदुर्गनगरी :
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे आज शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. 3.30 वाजता ओम गणेश बंगला, कणकवली येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता मोटारीने देवगडकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता वंदे मातरम कोस्टल साईक्लोथान कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : देवगड गार्डन, ता. देवगड)
रविवार दि. 15 रात्री 1 वाजता श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान (दक्षिण काशी) यात्रेनिमित्त प्रथम पुजेस उपस्थिती.
