*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नात्यात गोडवा*
नात्याच्या ओठांवर आपुलकीचा रंग विरघळतो,
चॉकलेटसारखा गोडवा मनात नात्यात दरवळतो..
लहानशा भेटीत मोठा आशय उमलतो,
शब्दांविना आपलेपणा हा गोडवा सांगतो..
कडू क्षणांवर साखर समजूत पेरते,
हास्यात प्रेमाचे गोड हसू मिसळते ..
वाटेवरचा थकवा हलका करून टाकते,
क्षणभरात जवळ तेच हसू आणते..
तुटक्या दिवसांना एक घास सांधतो,
वाटसरूंना मिळतेसोबत म्हणून जुळतो..
गोड देण्या-घेण्यात मायेचा मान वाढतो,
साध्या वाटपातून नात्यांचा अर्थ जुळतो..
रंगीत कागदात भावना क्षणांची आठवण जपते,
वेळ गेली तरी चव तीच मनात राहते..
हातात ठेवलेली गोडी विश्वासाने वाढवते,
त्याच विश्वासाने नात्यांना बळ देते..
तक्रारी विरघळून गोडी जवळीक उरते..
देण्या-घेण्यात गोडीने विश्वास पक्का करते..
आज चॉकलेट डे पण अर्थ रोज यावा,
नात्यात गोडवा आयुष्यभर ठेवावा..
वाटचालीत साथ देणारी हीच चव असावी,
मनामनांत नात्यातली गोडी अशीच टिकून रहावी..
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
