You are currently viewing कुणकेश्वरमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकला
Oplus_16908288

कुणकेश्वरमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकला

अमोल विजय लोके यांचा प्रभावी विजय, विरोधकांना दिला धक्का

देवगड/ कुणकेश्वर :

कुणकेश्वर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत ३६ कुणकेश्वर (सर्वसाधारण) मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अमोल विजय लोके यांनी जोरदार मुसंडी मारत विजय संपादन केला आहे. या लढतीत त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार गणेश गोपाळ वाळके यांचा पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले.

मतमोजणीचा निकाल स्पष्ट होताच कुणकेश्वर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना कार्यकर्ते आणि समर्थकांनी फटाके फोडत, घोषणा देत आणि एकमेकांना शुभेच्छा देत हा विजय जल्लोषात साजरा केला.

विजयानंतर बोलताना अमोल विजय लोके यांनी या यशाचे श्रेय मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला, कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीला आणि पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाला दिले. येत्या काळात मतदारसंघातील विकासकामांना गती देणे, पर्यटन विकासाला चालना देणे तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा