तळवडे पंचायत समिती मतदारसंघातून सलोनी संतोष तळवडेकर यांचा विजय
सावंतवाडी
पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील ३२ तळवडे (अनुसूचित जाती महिला) मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार सलोनी संतोष तळवडेकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार मयुरी मंगेश जाधव यांचा पराभव करत मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली.
निकाल जाहीर होताच तळवडे परिसरात शिवसेना कार्यकर्ते व समर्थकांनी आनंद व्यक्त केला. फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला
सलोनी संतोष तळवडेकर यांनी या विजयाचे श्रेय मतदार, कार्यकर्ते व पक्ष नेतृत्वाला दिले. मतदारसंघातील महिला, अनुसूचित जाती घटक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
