जि. प. मतदारसंघातून शिवानी नाईक तर पं. स. मतदारसंघातून अवनी राऊळ व प्रथमेश सावंत विजयी
सावंतवाडी :
माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवानी संजय नाईक यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला. पंचायत समिती मतदारसंघातून अवनी राऊळ व प्रथमेश सावंत हे दोघेही अपक्ष उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे तिघेही भाजपचे बंडखोर उमेदवार असून या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
