आंगणेवाडी श्री भराडी मातेचा वार्षिकोत्सव सुरू; भाविकांसाठी दर्शन व ओटी भरण्याची व्यवस्था
नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली असून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी पुढीलप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे:
भाविकांनी देवीचे दर्शन रांगेतून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व रांगांमधून देवीचे दर्शन तसेच ओटी स्वीकारण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
आज सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ३ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत ओटी भरण्यात येणार आहे.
रात्री ९.३० ते १२ या वेळेत धार्मिक विधी असल्याने दर्शन रांग तात्पुरती बंद राहणार आहे.
रात्री १२ नंतर पुन्हा ओटी भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.
उद्या मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ओटी भरणे व नवस फेडता येणार आहे.
जत्रोत्सव काळात भाविकांनी संयम व शिस्त पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
