आंगणेवाडीत उद्या ‘रील्स’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा…
नितेश राणे आणि निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती…
मालवण
हिंदू धर्मावरील विविध आव्हाने आणि सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, सिंधुदुर्ग तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘रील्स’ स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उद्या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेतील मंदिराशेजारी असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे.
या सोहळ्यात पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निलेश राणे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री मोहन सालेकर उपस्थित राहणार आहेत.
लव्ह जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद यांसारख्या विषयांवर आणि हिंदू समाजामध्ये धर्मांतराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी या अनोख्या ‘रील्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून युवकांनी आपल्या कलागुणांतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजित फाटक, सुभाष पुराणिक, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपणवार, आनंद प्रभू, विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, धर्मप्रसार प्रमुख अविनाश सामंत, मालवण प्रखंड बजरंग दल संयोजक गणेश चव्हाण, मालवण प्रखंड मंत्री अमोल गावडे व इतर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
या बक्षीस वितरण सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
