*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नदी – एक शिक्षण*
उगमापासून संगमापर्यंत
अविरत वाहत राहणे
हेच जीचे जीवन
त्या नदी कडून माणसाने
काहीतरी शिकून घ्यावे
प्रवाहातील प्रवासातील
सोबत्यांना आनंदाचे दान द्यावे
नदी कडून माणसाने
काहीतरी शिकून घ्यावे
निर्मळ स्वच्छ शुद्धतेचे
रूप अंतरी धरावे
नदी कडून माणसाने
काहीतरी शिकून घ्यावे
वाहता वाहता सुख वाटावे
वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला
तृप्त करत पुढे जात रहावे
नदी कडून माणसाने
काहीतरी शिकून घ्यावे
वाहत वाहत संगमावर स्वतःला
आनंदाने समर्पित करावे
नदी कडून माणसाने
काहीतरी शिकून घ्यावे
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
