मुंबई :
बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या अखिल मराठा फेडरेशनच्या द्वैवार्षिक सर्वसाधारण सभेत श्री. जी. एस. परब, सरचिटणीस – परब मराठा समाज, मुंबई यांची अखिल मराठा फेडरेशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. जी. एस. परब यांचा मावळते अध्यक्ष श्री. सुरेश सुर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मावळते सरचिटणीस सीए संतोष घाग, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री. दिनकरराव तावडे, निर्माण ग्रुपचे चेअरमन श्री. राजेंद्र सावंत, सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचे अध्यक्ष श्री. इंग्रजीत सावंत, मराठा बिझनेस फोरमचे अध्यक्ष श्री. अरुण पवार (माजी चीफ इनकम टॅक्स कमिशनर), मुलुंड मराठा मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. महेश चव्हाण तसेच अध्यक्ष श्री. रमेशराव शिर्के आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत मराठा समाजाच्या संघटनात्मक मजबुती, सामाजिक कार्य आणि भविष्यातील दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नव्या नेतृत्वाकडून समाजहितासाठी प्रभावी कार्य होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
