You are currently viewing आचरा बाजारपेठेत महायुतीची जोरदार प्रचार रॅली, घोषणांनी परिसर दुमदुमला

आचरा बाजारपेठेत महायुतीची जोरदार प्रचार रॅली, घोषणांनी परिसर दुमदुमला

आचरा बाजारपेठेत महायुतीची जोरदार प्रचार रॅली, घोषणांनी परिसर दुमदुमला

मालवण

“शिवसेना–भाजप–राष्ट्रवादी महायुतीचा विजय असो” आणि “महायुतीशिवाय पर्याय नाही” अशा जोशपूर्ण घोषणांनी आचरा बाजारपेठ गजबजून गेली. आचरा येथे काढण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार रॅलीला शिवसेना–भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मच्छीमार्केट येथून सुरू झालेली ही रॅली आचरा तिठा मार्गे शिवसेना प्रचार कार्यालयापर्यंत नेण्यात आली. या रॅलीत जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी, आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती उमेदवार दीपक सुर्वे सहभागी झाले होते. तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश राणे, आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रचार रॅलीत आचरा, चिंदर, त्रिंबक, वायंगणी, तोंडवळी, बांदिवडे परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. घोषणांनी व उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण बाजारपेठेचे लक्ष वेधले गेले.
रॅलीनंतर बोलताना जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी यांनी सांगितले की, महायुतीला मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून हाच उत्साह मतदानाद्वारेही व्यक्त करून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा