You are currently viewing माजगाव येथील प्रेरणा समाधीस्थळी भाईसाहेब सावंत यांना आदरांजली
Oplus_16908288

माजगाव येथील प्रेरणा समाधीस्थळी भाईसाहेब सावंत यांना आदरांजली

स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त मान्यवरांची उपस्थिती; दीपकभाई केसरकर व विक्रांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

सावंतवाडी :

लोकनेते आणि माजी मंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त माजगाव येथील प्रेरणा समाधी स्थळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांनी भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राज्याचे माजी मंत्री आमदार दीपकभाई केसरकर तसेच सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते समाधीवर पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भाईसाहेब सावंत यांनी महसूल, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याचे स्मरण करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बबन साळगावकर, अमोल सावंत, प्रदीप सावंत, अजित सावंत, व्हि. बी. नाईक, चंद्रकांत नाईक, अशोक दळवी, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, संजय कानसे, रवींद्र महापसेकर, संदीप राणे, डॉ. दिनेश नागवेकर, प्रसाद सावंत, म. ल. देसाई, राजू कुबल, सचिन बिर्जे, संजय लाड, अर्चित पोळके, मेघश्याम काजरेकर, प्रा. धीरेन्द्र होळीकर, एस. पी. नाईक आणि प्रा. सतीश बागवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून त्यांनी भाईसाहेब सावंत यांना अभिवादन केले.

या जयंती कार्यक्रमाला विविध संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा