सावंतवाडीत उद्या चिकित्सा शिबीर.
सावंतवाडी
कै. आर. बी. गोगटे जयंतीनिमित्त बुधवार ४ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी विठ्ठल मंदिरनजीक दिवाकर रेसिडन्सी येथे विद्ध कर्म, अग्निकर्म मोफत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सांधेदुखी, संधीवात, मान, कमर, मणक्याचे आजार, पायाची नस दुखणे, अॅलर्जीची सर्दी, डोळ्यांचे विकार, अर्धशिशि, (मायग्रेन), फीट, निद्रानाश, अनियमित मासिक पाळी आदी आजारांवर विद्ध कर्म, अग्निकर्म मोफत चिकित्सा केली जाणार आहे. रुग्णांनी मंगळवार ३ फेब्रुवारीपर्यंत डॉ. निनाद पटवर्धन यांच्याकडे (९४०५२९८३५२) नाव नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
