You are currently viewing माझं माहेर
Oplus_16908288

माझं माहेर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझं माहेर* 

 

पहाटेच्या प्रहराला

कोंबड्याची बांग होते

जाते पाळी माय माझी

दाणे दळाया बसते

 

माझ्या माहेराच्या घरा

गाईगुरे गोतावळा

वैरण बैलांना घालता

वाजती घुंगरू माळा

 

येता सणवार दिसं

पै पाहुण्यांचा लळा

कौलारू घरात होतो

नात्यागोत्याचा सोहळा

 

चार भावाचं हे गोतं

कसं एकत्र नांदत

गोकुळा गत माहेर

जन्मभराचं हे नातं

 

चुल घरी बायकांची

गडबड भाकरीची

कुणी कोड्यासं घालती

कुणी पोरास्नी न्हानती

 

आजोबांचा अंगणात

खडा दरारा असतो

गडीमाणसं मजूरं

आदरे त्यासी पुजतो

 

सायंकाळी झाडाखाली

दिवा कोनाडी लागतो

बालगोपाळ बसुनी

शुभंकरोती म्हणतो

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा