You are currently viewing अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी च्या वतीने कणकवली येथे उद्या शोकसभेचे आयोजन

अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी च्या वतीने कणकवली येथे उद्या शोकसभेचे आयोजन

अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी च्या वतीने कणकवली येथे उद्या शोकसभेचे आयोजन

कणकवली

राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी च्या वतीने सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचा अस्थिकलश कणकवलीत आणण्यात येणार आहे

*महाराष्ट्राचे कर्तबगार व सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून कै. अजितदादा पवार ओळखले जात होते. मात्र त्यांच्या अकस्मिक अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे एवढे नुकसान झाले आहे. म्हणूनच अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेसाठी पदाधिकारी,  कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित रहावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा